डॉक्टर एक जिवनदाता:- एक पत्र निशब्द करणारं एका हरलेल्या पतीच्या पत्नीला मिळालेलेजीवनदान. अनेकांना दिशा देणार

लेखनप्रपंच हा जाहीरातीसाठी नसून काही थोड्या लोकांमुळे आरोग्यसेवा ही व्यवसायात रूपांतरीत झाली हा जनमानसांचा झालेला ग्रह बदलण्यासाठी चा प्रयत्न.

मी गेल्या ५ वर्षांपासून जळगाव येथून पुणे येथे स्थलांतरित झालो.

साधारण १.५ वर्षांपूर्वी माझ्या सौभाग्यवती च्या अन्न नलिकेत लागन झाल्यामुळे जेवण बंद झाल्यासारखेच झाले तेव्हा मी पुणे येथील निष्णात पोटविकाराच्या डॉ कडे दाखवले मग ते दृष्टचक्र सुरू झाले म्हणजेच वेगवेगळ्या तपासण्या, औषधे. गुण मात्र शुन्य व वरचेवर वेगवेगळ्या शारीरिक समस्या.

त्यातच मी अदमासे २० वर्षे औषध विक्री च्या व्यवसायात घालवली असल्याने रोगनिदान जरी येत नसले तरी रोगावरचा औषधोपचार पुर्णतः नसला तरी माहीत होताच.

तशात अजून भर म्हणजे माहिती नसतांना सल्ला देणारे सगेसोयरे, मित्रमंडळ.

या १ वर्षात आयुर्वेदिक, ॲलोपॅथी, जडीबुटी, देवदेवता, जादूटोणा, होमिओपॅथी, युनानी असे सर्व उपचार झालेत.

या सर्वांमधून तात्पूरता आराम व पुन्हा परीस्थिती जैसे थे. रोगनिदान नाहीच.

दरम्यान पेशंट च्या पुर्ण शरीरात पाणी झाले, श्वासोच्छ्वास सुद्धा घेता येणे दुरापास्त झाले.

त्यातच माझे मोठे भाऊ चोपडा येथील रहिवासी यांचेकडच्या मोलकरणीला अशाच प्रकारच्या आजारात जिवनदान देणारे डॉ शरद देशमुख, मेडीलीव्ह हाॅस्पीटल नाशिक यांचे नाव समोर आले.

थोड्या तपासाअंती डॉ शरद देशमुख हे जळगाव जिल्ह्यातील कुर्हाड या गावचे आहेत व देशमुख आहेत असे समजल्यावर का कुणास ठाऊक परंतु त्यांचेकडे जाण्याची तीव्र सगळ्यांनीच इच्छा व्यक्त केली.

थोडा तपास केल्यानंतर १/२ लोकांनी त्यांचेविषयी आर्थिक बाबीवर नकारात्मक विचार मांडले व तेथेच मनाचा निर्धार पक्का झाला की आता पुण्याहून नाशिक कडे जायचे. कारण ज्या व्यक्ती कडे खरी गुणवत्ता असते त्याचेच विषयी आपोआपच जळावू प्रवृत्ती वृद्धिंगत होते.

आमचा उलटा प्रवास सुरू झाला, एकंदरीत लोक पुणे – मुंबई कडे जातात.

शेवटी दिनांक १/२/२४ रोजी डॉ शरद देशमुख यांचेकडे पेशंट ला भरती केले व या जादूई डॉ ला पेशंट चा आजार समजला, ही आमच्या साठी भाग्याची गोष्ट होती.

पेशंट ला भरती करतेवेळी वजन ६८ किलो होते. आज ७/१/२४ रोजी पेशंट ला डिस्चार्ज करतेवेळी वजन फक्त ४५ किलो. नाॅरमली पायी दवाखान्यात गेलेली लोक स्ट्रेचरवर घरी आणावे लागतात ही आजची परिस्थिती आहे.

आमच्या पेशंट ला स्ट्रेचर वर नेले व घरी चालत आणले.

वर्षभर झालेला त्रास, खर्च याच्या पटीत दवाखान्याचे झालेले बील, औषधोपचाराचा खर्च हा आमच्या दृष्टीने नगन्यच होता. डिस्काउंट मागणे हा आपला हक्कच समजून मी पण ते मागीतलेच व डॉ शरद देशमुखांनी ते मला दिले पण.

हा मेसेज डॉ शरद देशमुख यांचा प्रचार नसून (कारण आजच ते इतके व्यस्त असतात की सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत त्यांचा चेहरा बघने सुद्धा दुरापास्त असते) वैद्यकीय सेवा या क्षेत्रात माणूसकी, सहृदयता, सेवा, संबंध जोपासने हे शिल्लक आहे व डॉ शरद देशमुख यांचेसारखे देवदूत अजूनही आहेत.

डॉ शरद देशमुख साहेबांचे खरोखरच खूप खूप हार्दिक आभार.

कुणालाही अशाच प्रकारची समस्या असल्यास मेडीलीव्ह हाॅस्पीटल, द्वारका सर्कल जवळ, नाशिक – पुणे रोड, नाशिक येथे संपर्क करावा. फोन नंबर- 0253 2506599/ 8080883074 

धन्यवाद.

संजय देशमुख 

पुणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top